Essay On Lotus Flower In Marathi

फूल[संपादन]

कमळ हे पाण्यात वाढणार्‍या एका वनस्पतीचे फूल आहे. दिसायला सुंदर असणारी ही जलवनस्पती निलंबियासी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो नुसिफेरा आहे. तिच्या सुमारे १०० जाती जगभर आढळतात. मात्र तिचे मूळस्थान भारत, चीन आणि जपान असावे. इराणपासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यंत तिचा प्रसार झाला आहे.

कमळाच्या खोडा-पानाचे वर्णन[संपादन]

साधारणपणे गोडय़ा आणि उथळ पाण्यात वाढणारी ही वनस्पती एक ते दीड मीटर उंच आणि एकाच पातळीत येन मीटरपर्यंत पसरते. खोड लांब असून पाण्याच्या तळाशी जमिनीवर सरपटत वाढते. पाने मोठी वर्तुळाकार, छत्राकृती, ६०-९० से.मी. व्यासाची असतात. पानाचे देठ लांब असतात. पानावरील शिरा पानाच्या मध्यापासून किरणाप्रमाणे पसरलेल्या असतात. कमळाची पाने आणि फुले पाण्याच्या संपर्कात न राहता पाण्यावर येऊन वाढतात. कमळाचे फूल सुगंधी आणि मोठे असते. फुलांचा रंग जातींनुसार वेगवेगळा असतो. आपल्याकडे मुख्यतः गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची कमळे आढळतात.कामालाकडे विविध कितके आकर्षित होत असतात त्यामुळे तेतील जैविविधता टिकून राहते

कमळाची पुष्पथाली (कमळकाकडी) आणि बी (कमलाक्ष) यांचा वापर अनेक भारतीय, विशेषतः सिंधी लोक खाण्यासाठी करतात.

वैदिक महत्त्व[संपादन]

वैदिक वाड्मय कमळाचे गुणगान करताना थकत नाही. भगवान कृष्णानेहीगीतेमध्ये कमळाला आदर्श मानून तसे जीवन जगण्याचा उपदेश केलेला होता.

अनासक्तीचा आदर्श म्हणजे कमळ. संसारात राहूनही संसाराच्या दोषांपासून मुक्त राहण्याची जीवन दृष्टी कमळ देते. कमळाचे पान (पद्मपत्र) पाण्यात असूनही पाण्याचा एक थेंबही स्वत:ला लागू देत नाही. 'जलकमलवत्' संसारात राहाण्याची कला कमळाकडून शिकण्यासारखी आहे.

ज्ञानेश्वरीत तिसर्‍या अध्यायात मुक्त व योगी पुरुषाची लक्षणे सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात

जो अंतरी दृढु । परमात्मरूपीं गूढु । बाह्य तरी रूढु । लौकिक जैसा ॥ ६८ ॥
तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचे भय न धरी । प्राप्त कर्म न अव्हेरी । उचित जें जें ॥ ६९ ॥
तो कर्मेंद्रियें कर्मी । राहाटतां तरी न नियमी । परी तेथिचेनि ऊर्मी । झांकोळेना ॥ ७० ॥
तो कामनामात्रें न घेपे । मोहमळें न लिंपे । जैसे जळीं जळें न शिंपें । पद्मपत्र ॥ ७१ ॥

पाचव्या अध्यायात योगयुक्त पुरुषाची लक्षणे सांगताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात:

आतां अधिष्ठानसंगती| अशेषाही इंद्रियवृत्ती| आपुलालिया अर्थीं| वर्तत आहाती || ४८||
दीपाचेनि प्रकाशें| गृहींचे व्यापार जैसे| देहीं कर्मजात तैसे| योगयुक्ता || ४९||
तो कर्में करी सकळें| परी कर्मबंधा नाकळे| जैसें न सिंपे जळीं जळें| पद्मपत्र || ५०||


मानव परिस्थितीचा गुलाम आहे ही निराशाजनक विचारधारा भारतीय संस्कृतीला मान्य नाही. योगायोगाने वाईट वातावरणात/ परिस्थितीत जन्म झाला असला तरी पण मानव स्वतःचे ध्येय उच्च आणि दृष्टी उन्नत ठेवील तर तो मांगल्याकडे जाऊ शकतो अशी भारतीय संस्कृतीची धारणा आहे. चिखलात राहूनही ऊर्ध्व दृष्टी राखून सूर्योपासना करणारे कमळ ही गोष्ट किती सरळपणे समजावते आहे! कमळाला चिखलात निर्माण करून प्रभूने आपल्याला परिस्थिती निरपेक्ष जीवन जगण्याच्या प्रेरणेचे आगळे दर्शन घडविले आहे.

तसेच कमळ हे सौंदर्याचेही प्रतीक आहे. कवींनी मानवाच्या प्रत्येक अंगाला कमळाची उपमा दिलेली आहे. भगवंताच्या अवयवांनाही कमळाची उपमा देऊन ऋषीमुनींनी त्याचे पूजन केले आहे.

सारांश, कमळ म्हणजे अनासक्तीचा आदर्श, मांगल्याचा महिमा, प्रकाशाचे पूजन, सौंदर्याची निर्मिती आणि जीवनाचे दर्शन होय!

हेदेखील पहा[संपादन]

वैदिक प्रतीक-दर्शन

Tips Information in Marathi

Lotus Information in Marathi, Lotus Flower Essay


Lotus Information in Marathi

Kamal Flower – कमळ माहिती 

 • दिसायला अतिशय सुंदर असे हे फुल पाणवनस्पती वर वाढते. जगभरात कमळाच्या सुमारे १०० हून अधिक प्रजाती आहेत.
 • कमळ हि वनस्पती मुळची भारत, चीन आणि जपान येथील आहे. भारतात जवळपास सर्व प्रदेशात कमळे सापडतात. कमळ हे भारताचे व विएतनामचे राष्ट्रीय फुल आहे.
 • कमळ मुख्यतः गोड्या व उथळ पाण्यात वाढते. हे झाड सुमारे एक मीटर पर्यंत उंच वाढते व पाण्याच्या तळाशी पसरत वाढते.
 • पाने गोल असतात ज्यांचा व्यास सुमारे ६० ते ९० सेमी असतो आणि पाने मोठ्या देठाच्या सहाय्याने पाण्याच्या वर तरंगतात. कमळाची पाने कधीही ओली होत नाहीत आणि त्यावर पाण्याचे थेंब सुंदर मोत्यासारखे दिसतात.
 • कमळाची फुले देखील पाण्याच्या वर वाढतात. हि फुले मोठी, सुगंधी व सुंदर असतात. फुलांचा व्यास आठ इंच इतका असू शकतो.
 • कमळाची फुले पांढरी, गुलाबी, लाल, निळी, जांभळी, आणि पिवळी असतात. भारतात मुख्यतः पांढरी व गुलाबी कमळे आढळतात.
 • कमळाच्या मुळांचा वापर खाण्यासाठी सुद्धा होतो व त्यात मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे असतात. तसेच कमळाची फुले, पाने, बियादेखील खाण्यायोग्य आहेत. कमळात तंतुमय पदार्थ, विटामिन ब, लोह आणि जीवनसत्व खूप प्रमाणात असते.
 • आयुर्वेदीक औषधामध्ये कमळाच्या विविध भागांचा उपयोग केला जातो. वेदनाशामक आणि स्नायूंच्या दुखण्यावर उपाय म्हणून कमळ उपयोगी येते. तसेच हृदयरोगांमध्ये टॉनिक म्हणून कमळाचा उपयोग होतो.
 • चिखलात उगवून सुद्धा सौंदर्याचा उत्तम नमुना असलेल्या कमळाला प्राचीन संस्कृती तसेच काव्यामध्ये उच्च स्थान आहे.
 • कमळ विष्णू तसेच लक्ष्मी देवीला अतिशय प्रिय आहे. तसेच ब्रम्हदेवाची उत्पती कमळातून झाली असे मानतात, म्हणून कमळाला हिंदू तसेच बुद्ध संस्कृतीमध्ये पवित्र मानतात.
 • कमळाची फुले दिवसा उमलतात आणि रात्रीची बंद होतात म्हणूनच इजिप्शियन लोक कमळाचा आणि सूर्याचा संबध आहे असे मानतात. त्यांच्या मते सूर्याची उत्पती कमळापासून झाली. तसेच ते कमळाला पुनर्जन्म आणि उत्पत्तीचा प्रतिक मानतात.
 • कमळाच्या बिया अनेक वर्षानंतरही रुजू शकतात. चीनमध्ये सुकलेल्या तलावात सापडलेल्या एका प्रकारच्या कमळाच्या बिया १३००वर्षानंतर कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी मधील जीवशास्त्रज्ञांनी सफलतापूर्वक रुजविल्या आहेत.
 • कमळाची फुले उबदार असतात. वैद्यानिक मानतात की या वैशिष्ट्यामुळे थंड रक्ताचे कीटक कमळाकडे जास्त आकर्षित होतात.
 • कमळ आणि पाणलिली हि फुले एकसारखी दिसतात परंतु भिन्न कुळातील आहेत.
 • कोरिया, चीन आणि जपान मध्ये कमळाच्या सौंदर्याची प्रशंसा करणारा लोटस फेस्टिव्हल साजरा केला जातो.

Lotus Flower Information in Marathi / Lotus Flowers Wikipedia Language

flowers information in marathi

0 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *